सारोळा सोमवंशी सोसायटी बिनविरोध | पुढारी

सारोळा सोमवंशी सोसायटी बिनविरोध

देवदैठण : पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नाराजी नाट्याने अखेर बिनविरोध पार पडली. मात्र विरोधी गटाने माजी आमदार राहुल जगताप यांच्यावर नाराजी व्यक्त केली. संस्थेच्या निवडणुकीत दोन्हीही पॅनलच्या बाजूने 12 जागांसाठी 21 अर्ज भरले होते.

सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही गट माजी आमदार राहुल जगताप यांना मानणारे असल्याने निवडणूक सरळ सरळ बिनविरोध होईल, हे निश्चित होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याची अंतिम दिवशी सत्ताधारी गटाने कुणाचेही न ऐकता आपलेच सर्व उमेदवारी अर्ज कायम ठेवले. विरोधी गटाने मात्र ठरल्याप्रमाणे अथवा कुठलीच तडजोड होत नाही, पाहून नाराजी व्यक्त करीत आपले सर्व अर्ज माघारी घेतल्याने अखेर नाराजी नाट्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.

प्रवीण आढाव, विठ्ठल आढाव, अर्जुन उदार, शरद दुंडे, पोपट नवले, उत्तम ननवरे, भाऊसाहेब सोमवंशी, अन्वर शेख, अरुणा आगलावे, पुष्पा आढाव, भास्कर जगताप आणि अनिल आढाव आदींची संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर सर्व बिनविरोध उमेदवारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी तुळजाभवानी सहकारी संस्थेचे संस्थापक संदीप मापारे, माजी सैनिक ज्ञानदेव आढाव, संदीप ननवरे, देवीदास आढाव, इंद्रजित आगलावे, राजेंद्र उदार, अमोल नवले, सुलेमान शेख, अनिल शेळके आदींसह ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत

माजी आमदार जगतापांवर नाराजी

सत्ताधारी गटाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्याने त्यांच्या गेटात आनंदाचे वातावरण असले, तरी मात्र विरोधी गटाचे कार्यकर्ते मात्र झालेली निवडणूक आणि तालुकास्तरीय नेतृत्व माजी आमदार जगताप यांच्यावर संताप व्यक्त करून तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. सोशल मीडियावरही नाराजी नाट्याला चांगलेच उधाण आले आहे.

Back to top button