Jalgaon Accident News : ओव्हरटेक केल्याने विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार | पुढारी

Jalgaon Accident News : ओव्हरटेक केल्याने विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
एरंडोल येथे म्हसावद मार्गावरील श्री कृपा जिनिंग जवळ ईरटीका ट्रक ॲपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांच्या अपघात घडला आहे. दुचाकीस्वार राम कृष्ण भागवत पाटील हा युवक जागीच ठार झाला असून ही दुर्घटना रविवार (दि. ५) रोजी घडली. या घटनेबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक हा एरंडोल कडून म्हसावदकडे जात असताना ट्रकला (एमएच, डीक्यू 8174) क्रमांकाची दुचाकी मोटर सायकलने ट्रकला ओव्हरटेक केले. म्हसवादकडून एरंडोलकडे दुचाकी ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या (एमएच १९ व्ही १२६७) क्रमांकाच्या ॲपे रिक्षा (एम एच 18 बीसी 1408) आल्याने समोरासमोर वाहनांची धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील (रा. पाचोरा) हा युवक जागीच गतप्राण झाला. मयत तरुण हा कुटुंबातील एकुलता एक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

यावेळी गणेश पाटील (रा. खेडी), राजू भावसार (रा. एरंडोल), विठ्ठल वंजारी (रा. एरंडोल) तसेच उमरजे येथील काही ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदत कार्यासाठी सरसावले. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी यांना घटनेची माहिती मिळताच तत्परतेने ते अपघात स्थळी दाखल झाले होते.

Back to top button