Mumbai Customs: मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; मुद्देमालासह ५ जण ताब्यात | पुढारी

Mumbai Customs: मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; मुद्देमालासह ५ जण ताब्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी 12.74 किलो सोन्यासह एकूण 8.37 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Mumbai Customs)

दरम्यान अधिकाऱ्यांनी मेणातील सोन्याची धूळ आणि सोन्याचे थर लावलेले कापड, कच्चे दागिने आणि सोन्याच्या पट्ट्या अशा विविध स्वरूपात सोने पाण्याच्या बाटलीमध्ये आणि प्रवाशाच्या शरीरावर लपवून ठेवलेले आढळले. तसेच ४ आयफोन्स देखील जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात पाच प्रवाशांना अटक करण्यात आल्याचेही वृत्तात म्हटले आहे. (Mumbai Customs)

Back to top button