Weather Update : पाऊस पुन्हा वाढला; राज्यात ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता | पुढारी

Weather Update : पाऊस पुन्हा वाढला; राज्यात 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात थांबलेला पाऊस पुन्हा वाढला असून आता विदर्भात कमी अन् कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्याने जोर धरला आहे. दरम्यान मध्य व उत्तर महाराष्ट्रात दुपारी उन्हाचा चटका चांगलाच जाणवत असून मंगळवारी मालेगाव येथे पारा 42 अंशांवर गेला. मराठवाडा ते कर्नाटकपर्यंतच्या भागात समुद्र सपाटीपासून 9 कि.मी. उंचीवर वार्‍यांची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत मंगळवारी वादळी वारे, गारांचा पाऊस झाला. दिवसभर उन्हाची तलखी होती. तर सायंकाळी मात्र गारांचा पाऊस झाल्याने हायसे वाटावे असे वातावरण बहुतांश भागात होते. राज्यातील सर्वच भागात 20 एप्रिलपर्यंत पावसाचा मुक्काम वाढला आहे.

जोरदार पावसाची शक्यता असलेले जिल्हे

पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नाशिक, बीड, हिंगोली, अहमदनगर आणि मुंबई.

असे आहेत यलो अलर्ट-

  • कोकण : 17 ते 20 एप्रिल
  • मध्य महाराष्ट्र : 17 व 18 एप्रिल
  • मराठवाडा : 17 व 18 एप्रिल
  • विदर्भ :- अलर्ट नाही.

मंगळवारचे तापमान

मालेगाव 42.6, पुणे 40.8, लोहगाव 40.7, अहमदनगर 40.8, जळगाव 41.5, कोल्हापूर 39.1, महाबळेश्वर 33, मालेगाव 42.6, नाशिक 40.4, सांगली 39.6, सातारा 40.1, सोलापूर 40.6, धाराशीव 39.5, छत्रपती संभाजीनगर 39.3, परभणी 39.5, नांदेड 38.6, अकोला 41, अमरावती 39.4, बुलढाणा 39.8, ब्रम्हपुरी 39.8, चंद्रपूर 40, गोंदिया 37, नागपूर 37.

हेही वाचा

Back to top button