जरा जपून ! राज्यात पारा वाढता : विदर्भात वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज | पुढारी

जरा जपून ! राज्यात पारा वाढता : विदर्भात वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता वाढत आहे. राज्यातील बहुतांशी शहराचा कमाल तापमानाचा पारा 35 ते 40 अंशांवर पोहोचला आहे. तर सलग दुसर्‍या दिवशी मालेगाव शहराचे कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला आहे. दरम्यान, विदर्भात पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून वाढू लागली आहे. अर्थात काही विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात गारपीट, वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्याच दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकणात मात्र उन्हाची तीव्रता हळूहळू वाढू लागली होती. आता मात्र मार्च सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत आहे. दक्षिण भारताकडून राज्याकडे उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे उन्हाची तसेच उकाड्याची तीव्रता वाढत आहे. सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. दरम्यान, ओडिसापासून मध्य- पूर्व अरबी समुद्र पार करून दक्षिण छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटकपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या स्थितीमुळे विदर्भात पुढील तीन ते चार दिवस वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

हेही वाचा

Back to top button