डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी शाहू महाराज, पी. एन. यांची चर्चा

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी शाहू महाराज, पी. एन. यांची चर्चा
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांनी बुधवारी सकाळी काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांच्यासह 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची 'इंदिरा निवास' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी 'पुढारी'चे समूह संपादक व चेअरमन डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.

कोल्हापूर मतदारसंघातील शाहू महाराज यांच्या उमेदवारीविषयी चर्चा झाली. आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत, असे सांगून शाहू महाराज यांनी डॉ. जाधव यांच्याकडे सहकार्याची आणि पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे. महाविकास आघाडीत चर्चा होऊन ही जागा काँग्रेसकडे आली. शाहू महाराज यांचे नाव पुढे आल्यानंतर आघाडीत त्यांच्या नावाविषयी एकमत झाले आहे. शाहू महाराजांनी काँग्रेसमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचे नाव निश्चित झाले आहे, अशी माहिती आ. पी. एन. पाटील यांनी दिली.

आ. पी. एन. पाटील म्हणाले, 'पुढारी'ने इतक्या वर्षांत अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी केले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात आपला शब्द प्रमाण मानला जातो. ऊस आंदोलनासह अनेक लढ्यांत आपली भूमिका निर्णायक ठरलेली आहे. आपण आतापर्यंत किंगमेकर म्हणून अनेकांना विविध पदांवर बसवले आहे. आता आपणा सर्वांना शाहू महाराज यांना खासदार करावयाचे आहे.

यावेळी डॉ. योगेश जाधव यांचे आ. पी. एन. पाटील यांनी 'पुढारी' न्यूज चॅनेलबद्दल अभिनंदन केले. एवढे चांगले न्यूज चॅनेल दुसरे कुठलेही नाही. सर्वजण आपलेच चॅनेल आवर्जून पाहतात, असे उद्गार त्यांनी काढले आणि आपलेही आम्हाला सहकार्य हवे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक संदर्भात चर्चा झाली. यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शाहू महाराज यांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news