

वाशिम; अजय ढवळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार प्रहार करत आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 13 मार्च रोजी वॉशिंग जिल्ह्यातील कारंजा आणि वाशीम येथील सभेला संबोधित करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. संविधान बदलण्यासाठी भाजपला लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकायच्या आहेत, त्यानंतर देशात निवडणुका होणार नाहीत, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, लोकांनी आपल्यासमोर असलेल्या धोक्याची जाणीव ठेवली पाहिजे. तुमच्या मतदार संघातील गद्दार ताई, भाऊ यांना हद्द पार करा
ते म्हणाले की अब कि बार चारसो पार जागा भाजपला देश विकासासाठी नाही तर भारताचे संविधान बदलविण्या साठी पाहिजे आहे त्यांना देशात हुकूमशाही आणायची आहे. एकदा हुकूमशाही आणून सगळे अधिकार आपल्या हातात घेऊन देशातील जनतेला देशोधडीला लावायचे आहे. अशा असंख्य व गंभीर मुद्यावर हात घालत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सांगता केली. भर उन्हात देखील नागरिकांची मोठी गर्दी केली होती. यावेळी मंचावर जनसंवाद मेळाव्याला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मेळाव्याचे मुख्य आयोजक शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी,संजय देशमुख,यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.