राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या प्रकरणावर उद्या सुनावणी | पुढारी

राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या प्रकरणावर उद्या सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय मंगळवारी ( दि. ११ जुलै) सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर ही सुनावणी घेण्यात येईल.राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अशात न्यायालय स्थगिती कायम ठेवणार की नियुक्तीचा मार्ग मोकळा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारने बारा जणांची यादी विधान परिषदेवरील नियुक्तीसाठी पाठवली होती.पंरतु, कोश्यारी यांनी या नावांना अखेरपर्यंत मंजुरी दिली नव्हती.राज्यात सत्तांतर होताचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने नवीन यादी पाठवताच जुनी यादी राज्यपालांकडून परत पाठवण्यात आली होती.

राज्यपालांच्या या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच तत्कालीन राज्यपालांनी नियमबाह्यरित्या आधीची यादी परत पाठवली,असा आक्षेप घेत हे प्रकरण न्यायालयात पोहचले होते.त्यानंतर न्यायालयाने सप्टेंबर २०२२ मध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीला स्थगिती दिली होती.

हेही वाचा :

 

Back to top button