वीज दरवाढीचा दोन दिवसांत निर्णय; एप्रिलपासून मोजावे लागणार ‘इतके’ पैसे | पुढारी

वीज दरवाढीचा दोन दिवसांत निर्णय; एप्रिलपासून मोजावे लागणार 'इतके' पैसे

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा :  कोळशाचे वाढते दर व इतर कारणांमुळे महागलेली वीज पुरवण्यासाठी वीज बिलात 2023-24 व 2024-25 या दोन वर्षांसाठी वाढ करावी, अशी मागणी महावितरणच्या वतीने विद्युत नियामक आयोगाकडे करण्यात आली. याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार असून, मंजुरी मिळाली तर एप्रिलपासून प्रतियुनिट 5 रु. 10 पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

महावितरणच्या वतीने कोरोना काळातील वीज बिल वसुली आणि कोळशाच्या तुटवड्यामुळे चढ्या दराने विकत घ्यावी लागलेली वीज यातील तफावत भरून काढण्यासाठी 2023-24 मध्ये 14 टक्के, तर 2024-25 मध्ये 11 टक्के विजेच्या दरात वाढ करण्याची मागणी विद्युत नियामक आयोगाकडे केली. यापैकी किती दरवाढीला मंजुरी मिळेल, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत निर्णय झाला; तर वीज 1 एप्रिलपासून महाग होणार आहे.

प्रतियुनिट 5 ते 18 रुपये मोजावे लागणार

या दरवाढीमुळे प्रत्येक युनिटला 5 ते 18 रुपये वर्गवारीनुसार मोजावे लागणार आहेत. आजघडीला घरगुती विजेसाठी प्रतियुनिट 3.36 पैसे मोजावे लागतात. प्रस्तावित दरवाढ झाली, तर 2023-24 मध्ये 4.50 तर 2024-25 मध्ये 5.10 पैसे हा केवळ 1 ते 100 युनिटपर्यंतचा दर आहे. हा वापर 500 युनिटच्या वर असेल तर हा दर प्रतियुनिट 18 रु. 70 पैशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इतर राज्यांतील दर इतर राज्यांत महाराष्ट्रापेक्षा वीज दर कमी आहेत. या दरात स्थिर आकार, वहन व इतर आकाराणीचा समावेश केलेला आहे. खालील दर 2022 पर्यंतचे देण्यात आले आहेत.

Back to top button