एसटी अपघातातील आठ जणांची ओळख पटली | पुढारी

एसटी अपघातातील आठ जणांची ओळख पटली

पुणे, पुढारी वृत्तसेवा : एसटी बस नर्मदा नदीमध्ये कोसळून मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात मरण पावलेल्या १३ जणांपैकी आठजणांची ओळख पटली असून, यातील काही जण अंमळनेर, इंदूर आणि राजस्थानचे रहिवसी असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

ही एसटी बस इंदूरहून अंमळनेरकडे निघाली असताना बस चालकाचा ताबा सुटल्याने ती नर्मदाा नदीत कोसळली. आोळख पटलेल्या प्रवाशांमध्ये चालक – चंद्रकांत एकनाथ पाटील, वाहक – प्रकाश चौधरी, निंबाजी आनंद पाटील, कमलाबाई आनंद पाटील, चेतन गोपाल जांगिड, जगन्नाथ हेमराज, सैफुद्दीन अब्बास व अरवा मूर्तजा यांचा समावेश आहे. या अपघातात आणखी काही प्रवासी वाहून गेले असण्याची भीतीहीव्यक्त करण्यात येत आहे.

सांगली : यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार वृंदा करात यांना जाहीर

इंदूरहून अमळनेरला जाणाऱ्या बसला अपघात झाला. अपघातात 13 जणांचा मृत्यू, 8 जणांची ओळख पटली आहे. यात 9 पुरुष आणि 4 महिला आहेत. मध्य प्रदेश परिवहन विभागाचे अधिकारी या अपघाताची चौकशी करत आहेत. याबाबतची अधिकृत माहिती लवकरच समजेल.

                                                           – शेखर चने, उपाध्यक्ष, एस टी महामंडळ

भंडारा : नाल्यात विद्यार्थी वाहून गेला

Back to top button