अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला | पुढारी

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई: पुढारी ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारच्या कामांना स्थगिती दिल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे समजते.

राज्यात सत्तेत आल्यानंतर लगेच एकनाथ शिंदे सरकारने नगरविकास विभागाच्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. यात बारामतीला सर्वाधिक २४५ कोटी निधी दिलेल्या कामांचा समावेश आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयाने अजित पवारांना दणका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. याआधीच्या कामांना स्थगिती देऊ नका, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

शिंदे सरकारने स्थगिती दिलेल्या कामांना मार्च २०२२ ते जून २०२२ या दरम्यान मंजुरी देण्यात आली होती. विशेष म्हणजे शिवसेना आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिलेली नाही. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी जी कामे सुचवली होती त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. अजित पवार अर्थमंत्री असताना बारामतीला सर्वाधिक निधा दिला. पण आम्हाला निधी जात नसल्याची शिवसेना आमदारांची तक्रार होती. आता शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांना स्थगिती दिली आहे.

 हे ही वाचा :

Back to top button