नगर : धर्मवीरगड येथे 38 प्राचीन पटखेळांचा शोध | पुढारी

नगर : धर्मवीरगड येथे 38 प्राचीन पटखेळांचा शोध

घारगाव : पुढारी वृत्तसेवा : पेडगाव येथील भीमा नदीतिरी असलेल्या धर्मवीरगडावर असलेल्या राजमहाल, लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर येथे प्राचीन पट खेळ आढळून आले आहेत, तसेच लिंपणगाव येथील सिद्धेवर मंदिरात, देऊळगाव गलांडे आणि बेलवंडी कोठार येथील चालुक्य कालीन बारवांवर काही प्राचीन खेळपट आढळून आले आहेत. या ठिकाणी नवकंकरी, मंकळा, पंचखेलीया, वाघबकरी या खेळांचे दस्तावेजीकरण व नोंद करण्यात आली.

सरकार स्थापनेसाठी भाजपकडून वेगाने हालचाली, फडणवीस दिल्लीला रवाना

प्राचीन पटखेळ संवर्धन मोेहिमेंतर्गत (महाराष्ट्र राज्य) प्राचीन पटखेळांचे संशोधन व शोधमोहीम सुरू आहे. नाशिकचे प्राचीन पटखेळ अभ्यासक व पुरातत्त्व शास्त्रज्ञ सोज्वळ साळी यांनी श्रीगोंदा तालुक्यात भेट दिली. धर्मवीरगड येथील महालातील कारंजाच्या खोलीच्या सुरुवातीला, कारंजाशेजारी, तसेच आतमध्ये असलेल्या स्नानकुंडाच्या बाजूला 62 – अडी (घाना), अंडोत (सुदान), अजिटो/योवोदजी (बेनिन, निगेरिया), इन डोडोई (केनिया, टांझानिया), लॅठो (इथिओपिया), लिब अल-अकील (इजिप्त) या नावांनी त्या-त्या देशांत हे खेळ ओळखले जातात.

एकनाथ शिंदे गुवाहाटीत पहिल्यांदाच मीडियासमोर, संपर्कातील आमदारांची नावे सांगा, ठाकरेंना दिले आव्हान

दोनशेच्यावर खड्डे अढळले

कारंजाच्या वर असलेल्या ठिकाणी 102 आणि 122 प्रकारचे खड्डे आढळले आहेत. त्यांना बुलटो (इथिओपिया), बुला (केनिया) असे पटखेळ आढळले. राजेशाही आणि उच्चभ्रूंचे मनोरंजन म्हणून काही खेळ न्यायालयीन संस्कृतीचे सामान्य वैशिष्ट्य बनले. त्यात भेटवस्तू म्हणून देखील पटखेळ दिले गेले. लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात इंडो-रोमन देशातील नाईन मेन्स मॉरिस, नेपाळ देशातील वाघ बकरी यांचे पट शोधण्यास यश आले आहे. शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे, सचिव सोमेश शिंदे, डॉ. चंद्रशेखर कळमकर, मारुती वागस्कर, गणेश कुदांडे, संगीता इंगळे यांच्या फिरस्तीतून आढळलेल्या या खेळांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे समर्थक ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

सन 2017 ते 2021 या कालावधीत एकूण 350 पट खेळांची नोंद करण्यात आली आहे. त्यात नाशिकची त्रिरश्मी लेणी (पांडवलेणी), गोंदेश्वर मंदिर, ऐश्वरेश्वर मंदिर, बोरिवलीमधील मंडपेश्वर लेणी, मोहोळ व सोलापूरमधील खेळ, लोणारमध्ये असलेल्या मंदिरातील पट नोंदविण्यात आले होते. परंतु लॉकडाऊनमुळे हे काम थांबविण्यात आले होते. फेब्रुवारी 2022 मध्ये मारुंजी येथील 41 पट, कापूरहोळ येथील 36 पट, वैष्णवधाम येथील 26 पट, तुळजा लेणी जुन्नर येथील 28 पट, जुन्नर परिसरातील कबरीमध्ये 13 खेळ, भोरमध्ये 18 व आता श्रीगोंद्यामध्ये 38 पटखेळ आढळले असून संपूर्ण महाराष्ट्रातून मिळालेल्या कोरीव पट खेळांची आजपावेतो संख्या 889 इतकी नोंद व दस्तऐवजीकरण झाले आहे.

Anand Mahindra qualification : आनंद महिंद्रांना नेटकर्‍याने विचारलं, तुमचं शिक्षण किती? ; उत्तराने सर्वांची मने जिंकली

धर्मवीरगड, पेडगाव, लिंपणगाव येथील मंदिरात दक्षिण आफ्रिकेतील मंकला खेळाचा उपप्रकार ओवरे, इंडो-रोमन देशातील नाईन मेन्स मॉरिस, नेपाळ देशातील वाघबकरी यांचे पट शोधण्यात यश आले आहे. यावरून व्यापारी, प्रवासी, बौद्ध भिक्षुक अथवा मुघल साम्राज्यातील सैनिक या मार्गांवरून जात असावेत, असा अंदाज मांडता येऊ शकतो. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

Back to top button