गृहमंत्रालयातील २१ जण कोरोना पॉझिटिव्ह | पुढारी

गृहमंत्रालयातील २१ जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्याच्या गृहमंत्रालयातील कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज (दि. ७) २१ जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती सूत्रांकडून समजते. दरम्यान, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानवरचे कर्मचा-यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिली.

गेल्या २४ तासांत भारतात कोविड-१९ चे १,१७,१०० नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. ही आकडेवारी त्याच्या अधीच्या दिवसाच्या तुलनेत २८.८ टक्के जास्त आहे. नोंदवलेल्या नवीन प्रकरणांपैकी ६७.२९ टक्के रुग्ण हे पाच राज्यातील आहेत. तर गेल्या २४ तासांत ३६,२६५ रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी तूर्तास लॉकडाऊन अथवा जिल्हाबंदी केली जाणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुंबईतील लोकल ट्रेन बंद करण्याचाही सरकारचा कोणताही विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून कोरोना उपाययोजना आणि अंमलबजावणीचा आढावा घेतला व अंमलबजावणी अधिक कडक करण्याच्या सूचना केल्या.

Back to top button