खराब हवामानात मैदान वाचवण्यासाठी महिला खेळाडू आल्या धावून, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

खराब हवामानात मैदान वाचवण्यासाठी महिला खेळाडू आल्या धावून, व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियामध्ये महिलांची क्रिकेट लीग स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेवेळी खराब हवामानामुळे सामना थांबवण्यात आला होता. यादरम्यान मैदानावर अस दृश्य दिसले की यामुळे सगळ्यांनीच महिला खेळाडूंच कौतुक केलं आहे. महिला खेळाडूंनी लोकांची मनं जिंकली आहेत. खेळाडूंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या सामन्यावेळी बघता बघता काळे ढग आले आणि मैदान वाचवण्यासाठी ग्राउंडसमन लगेचच मैदानावर आले आणि कव्हर टाकू लागले. यावेळी वारा जास्त असल्यामुळे ग्राउंडसमन यांना अडचणी येवू लागल्या. यावेळी त्यांना अधिक लोकांची गरज होती.

याचवेळी महिला खेळाडू मैदानात धावत आल्या. आणि मैदानावरील ग्राउंडसमन यांना मदत केली. महिला खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 17 डिसेंबर रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली.

व्हिक्टोरिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यू साउथ वेल्सने निर्धारित षटकात 300 धावा केल्या. खराब हवामानामुळे व्हिक्टोरियाला 35 षटकांत 256 धावांचे लक्ष्य मिळाले असले, तरी निर्धारित षटकात संघाला 229 धावाच करता आल्या. न्यू साउथ वेल्सने हा सामना 26 धावांनी जिंकला.

हेही वाचलत का?

Back to top button