Nashik Crime News | पोषण आहारावर डल्ला मारणाऱ्यांचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्यामुळे निष्फळ | पुढारी

Nashik Crime News | पोषण आहारावर डल्ला मारणाऱ्यांचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्यामुळे निष्फळ

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
शालेय पोषण आहारातील तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी आणला जात असताना सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. शुक्रवारी (दि. ८) ही छापा कारवाई केली. पोलिसांनी एकूण ७३ गोण्या तांदूळ जप्त केला आहे. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील राजगृह महिला बचत गट व छत्रपती शाहू महाराज बचत गटाच्या गोदामातून शालेय पोषण आहारातील तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन झाल्टे यांना मिळाली होती. एका वाहनातून (एमएच ४१ जी ३२८३) शालेय पोषण आहारातील तांदूळ खुल्या बाजारात आणला जात होता. दरम्यान पोलिसांच्या मदतीने वाहनाची तपासणी केली असता त्यात ७३ गोण्या तांदूळ आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता, हा तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची कबुली वाहनचालकाने दिली.

पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल जप्त करीत तो कॅम्प पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी बचतगटाचे पदाधिकारी बाजीराव नथू लांडगे (रा. शिपाई कॉलनी, सटाणा नाका) वराजेश गंगावणे (रा. वर्धमाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button