नाशिकमध्ये अजित पवार गटाचा जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह | पुढारी

नाशिकमध्ये अजित पवार गटाचा जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

नाशिक : पुढारी ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे असेल, असा निर्णय निवडणूक आयोगाने काल (दि. 6) दिला. या निर्णयाचे नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले आहे. राष्ट्रवादी भवनसमोर ढोलताशांच्या गजरात जल्लोष करीत एकमेकांना कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पेढे भरवले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, सामाजिक न्याय प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, युवक जिल्हाध्यक्ष चेतन कासव आदी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून या निर्णयाची चर्चा होती. काल निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्याबाजुने निकाल देऊन शरद पवार गटाला मोठा धक्का दिला. त्यानंतर राज्यभरातील अजित पवार गट व समर्थकांकडून रात्रीच या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. नाशिकमध्येही या निर्णयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळी (दि. 7) पक्षाच्या कार्यालयासमोर जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

हेही वाचा

Back to top button