Horoscope Today : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, ३० जानेवारी २०२४ | पुढारी

Horoscope Today : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, ३० जानेवारी २०२४

मेष ः कामाबाबत आणि द़ृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. द़ृढनिश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. प्रवासाच्या संधी शोधाल.

वृषभ ः गैरसमज दूर होतील. प्रेमाचा प्रवास मधुर, पण क्षणकाल टिकणारा असेल. काही जणांना अर्धवेळ कामे मिळतील.

मिथुन ः कुटुंबातील स्थिती फारशी चांगली राहणार नाही. घरात कुठल्यातरी गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता.

कर्क ः कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक द़ृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका.

सिंह ः समूह कार्यात सहभागी झालात तर नवीन मित्र भेटतील. प्रेमाचा आनंद घेता येईल. आज खूपच कार्यशील असा दिवस आहे.

कन्या ः घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. आजूबाजूची माणसे असे काहीतरी करतील, ज्यामुळे जोडीदार एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

तूळ ः संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. आजचा दिवस खूप रोमँटिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल.

वृश्चिक ः आज तुम्हाला जादूई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल.

धनु ः आर्थिक लाभ होऊ शकतो. बेफिकीरपणामुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्यापूर्वी त्यांना विश्वासात घेण्याची गरज.

मकर ः महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग टीप मिळून जाईल. कोणत्याही संकटावर मात करण्याची तुमच्याकडे जबर इच्छाशक्ती आहे.

कुंभ ः मालमत्तेची कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस.

मीन ः उद्योग – व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button