मोबाईलच्या ट्रान्सपरंट कव्हरची झाली दुर्दशा ? असे बनवा पुन्हा चकाचक | पुढारी

मोबाईलच्या ट्रान्सपरंट कव्हरची झाली दुर्दशा ? असे बनवा पुन्हा चकाचक

पुढारी ऑनलाईन : मोबाईल कोणत्याही कंपनीचा असो मोबाइल कव्हर मात्र स्टायलिश असावं असे अनेकांना वाटते. त्यातही ट्रान्सपरंट कव्हरला अनेकांची पसंती असते. पण सुरुवातीला डिसेंट दिसणारे हे कव्हर कालांतराने मळतात, पिवळसर होऊ लागतात. हे टाळायचे असल्यास पुढील टिप्स जरूर वापरा.

बेकिंग सोडा : बेकिंग सोडा कोणताही डाग मिटवू शकतो. अनेकदा कव्हरवर तेलाचे डाग लागतात. जे काढायला बरेच कष्ट पडतात. यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट बनवा. कव्हरवर लावून ठेवा. अर्ध्या तासाने धुवून टाका कव्हर चकाचक होऊन जाईल.

टुथपेस्ट : दात घासण्याव्यतिरिक्त इतर अनेक कामांसाठीही टुथपेस्ट वापरली जाते. ती मोबाईल कव्हरही चकाचक करण्याच्या कमी मदतीस येते. पेस्ट संपूर्ण कव्हरवर लावून घ्या. नंतर हलक्या हाताने पुसा. कव्हर चकाचक होईल.

मिठाने करा स्वच्छता : बेकिंग सोडयाप्रमाणेच मिठाचा उपयोगही कव्हर स्वच्छ करण्यासाठी करतं येणं शक्य आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून मोबाईल कव्हर बुडवून ठेवा. काहीवेळाने बाहेर काढून स्वच्छ करून ठेवा.

Back to top button