राजस्थानमध्ये सचिन पायलट होणार मुख्यमंत्री? गेहलोत मंत्रिमंडळाचा राजीनामा | पुढारी

राजस्थानमध्ये सचिन पायलट होणार मुख्यमंत्री? गेहलोत मंत्रिमंडळाचा राजीनामा

जयपूर: पुढारी ऑनलाईन

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी रात्री आठच्या दरम्यान राजीनामे दिले. मुख्यमंत्री गेहलोत पदावर असून ते रात्री उशिरा राजीनामा देण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकारणात कमबॅक करण्यास इच्छुक असलेल्या सचिन पायलट यांच्याकडे राजस्थानची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांतील अंतर्गत aवादातून पायलट यांनी आपल्या समर्थकांसह राजीनामा दिला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापाठोपाठ ते भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर वारंवार गेहलोत यांना सांगून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. हायकमांडने सांगूनही गेहलोत बधले नाहीत. त्यामुळे पालयट यांच्यावर हात चोळत बसण्यापलिकडे काहीच राहिले नाही.

आज सायंकाळी गेहलोत यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी आपल्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलविली. या बैठकीत तासभर खलबते झाली. त्यांनतर त्यांनी सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्याची सूचना केली. त्यानुसार सर्व मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील असे सांगितले जात आहे.

राजस्थान मंत्रिमंडळात २१ जागा असून त्यापैकी ९ जागा रिक्त होत्या. उद्या सायंकाळी चार वाजता नवे मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजस्थानात हालचाली गतिमान झाल्या होत्या. गेहलोत यांच्या जवळच्या तीन मंत्र्यांनी काल राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती.

महसूलमंत्री आणि बारमेरचे आमदार हरीश चौधरी यांना पंजाबचे प्रभारी बनवण्यात आले आहे. अजमेरमधील केकडी येथील आमदार रघू शर्मा यांना गुजरातचे प्रभारी बनविले आहे. या दोन्ही राज्यात आगामी निवडणुकांची काँग्रेस तयारी करत आहे.

राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये ‘एक पद एक व्यक्‍ती’ या नियमानुसार मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाची ‘एक पद एक व्यक्‍ती’ शिस्त पाळत आम्ही पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आमचे राजीनामे दिले आहेत. राजस्थानमधील जनतेला राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे.’

मंत्रिमंडळ फेरबदलासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत खलबते सुरू होती. अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींसह पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना पायलट यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत सूचना दिल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून गेहलोत बधले नव्हते. मात्र, पक्षाने आदेश दिल्यानंतर गेहलोत मागे पडले आहेत.

पालयट यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता असून गेहलोत राजीनामा देतील अशी शक्यताही वर्तविली जात आहे. तसेच झाल्यास पालयट यांच्याकडे नेतृत्व दिले जाऊ शकते.

हेही वाचा :

Back to top button