बेल्हे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला | पुढारी

बेल्हे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

आळेफाटा (पुणे); पुढारी वृत्तसेवा

बेल्हे (ता.जुन्नर, जि.पुणे) शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम चाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१९)घडली. घरगुती वादातून की राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. (Pune Attack)

याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात चाटे यांचा चुलत भाऊ साहेबराव धनंजय चाटे यासह दोन अज्ञात इसमांविरुद्ध घातक ह्त्त्याराने जबर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आळेफाटा पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी बेल्हे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष एकनाथ चाटे मोटर सायकल ( एम एच १४ डी व्ही ४९८६) वरून आळेफाटा येथील काम उरकून बेल्हे येथे घरी जात असताना, चुलत भाऊ साहेबराव धनंजय चाटे याने त्यांचा पाठलाग केला. राजुरी पास करून पुढे स्वामी कृपा लॉन्स मंगल कार्यालय समोरील हायवे रोड कडे जात असताना अचानक त्यांच्या डोक्याचे पाठीमागील बाजूस जोरात लोखंडी रॉडने मारल्याने ते मोटरसायकलवरून जमिनीवर पडले. (Pune Attack) त्यावेळी त्यांना चुलत भाऊ साहेबराव चाटे सोबत दोन अनोळखी इसम हातामध्ये लोखंडी रॉड घेऊन उभे होते.

ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्याने त्यांना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आळेफाटा पोलिसांनी एकनाथ चाटे यांच्याफिर्यादीवरून त्याच्या चुलत भावासह दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

हे ही वाचा :

Back to top button