Dapoli ncp vs shivsena : दापोलीत राष्ट्रवादीने शिवसेनेचा केला करेक्ट कार्यक्रम, नगराध्यक्षांचा परिवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

Dapoli ncp vs shivsena : दापोली नगर पंचायतीच्या आणि शिवसेनेच्या नगराध्यक्ष परवीन शेख यांच्या परिवातील सदस्यांनी आज (दि २०) रोजी रायगड येथे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाला शेख यांची उपस्थिती होती.
दापोलीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दापोलीत शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
- PM Modi UP visit : मोदी आलेत, बाल्कनीत दारात, खिडक्यांवर कुणीही कपडे वाळत घालू नका
- मोबाईल चोरल्यानंतर चोर म्हणाला- दीदी…सुनो फोन नहीं मिलेगा, तुम्हें नया ही खरीदना पड़ेगा
शिवसेना शाखा प्रमूख वाहिद शेख, युवा शाखा अधिकारी आदिल शेख, सलमान मुजावर, वासिफ हजवानी, यांच्या समवेत भाऊ मोहिते यांची कन्या दीपाली मोहिते-पवार यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
Dapoli ncp vs shivsena : दापोली तालुक्यात सेने राष्ट्रवादीची पळवापळवी
राष्ट्रवादीचे दापोली पंचायत समितीचे माजी सभापती रहुफ हजवाणी यांचे सभापती कार्यकाळात शिवसेनेने त्यांच्याशी जवळीक साधून दापोली पंचायत समितीत आपली वर्दळ वाढवली होती.
तोच फॉर्म्युला दापोलीत राष्ट्रवादीने आवलंबला असून शिवसेनेला पेचात टाकले आहे.
शरद पवार जाणते राजा नव्हे लुटारू नेते : सदाभाऊ खोत https://t.co/NXhlAji6x8
— Pudhari (@pudharionline) November 20, 2021
शिवसेनेचे दापोली क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर दापोलीत राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन जाधव यांनी सेनेत प्रवेश केला.
त्यानंतर पंचायत समितीच्या माजी उप सभापती ममता शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- bjp mp varun gandhi : भाजप खासदार वरूण गांधी म्हणतात, शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्याना १ कोटींची मदत द्या
- Awade and Mahadik : विधानपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान प्रकाश आवाडे आणि महादेवराव महाडिक यांच्यातील व्हिडिओने खळबळ
राष्ट्रवादीने नगराध्यक्षांचा पक्षप्रवेश केल्याने खळबळ
हा पक्ष प्रवेशाचा सिलसिला सुरू असतानाच दापोलीत शेख यांचे परिवाराने राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून दापोली शहरात राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
हा पक्ष प्रवेश खासदार सुनिल तटकरे, माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदिप राजपुरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस विकास जाधव, माजी जि. प सदस्य बिरवटकर, यावेळी उपस्थित होते.