Nashik Leopard : सातपूर मळे परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद, गंगापूररोडलाही दर्शन | पुढारी

Nashik Leopard : सातपूर मळे परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद, गंगापूररोडलाही दर्शन

सातपूर : पुढारी वृत्तसेवा; सातपूर मळे परिसरात गेल्या बऱ्याच दिवसांपासून तीन ते चार बिबट्यानी धुमाकूळ घातला आहे. त्या अनुषंगाने तेथील नागरिकांनी वन विभागाला त्याबाबत माहिती दिली असता वनविभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी त्या पिंजऱ्यात एक बछडा अडकला परंतु मोठे बिबटे मोकाट असल्याचे सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून समोर आले. तसेच त्या बिबट्यांनी परिसरातील कुत्र्यांचा देखील पडश्या पाडल्याचे वेळोवेळी निदर्शनात आले. त्या अनुषंगाने वनविभागाने वारंवार बिबट्यांच्या वास्तव्याची पाहणी करून तशी रणनीती आखून पिंजरे लावण्यात आले.

आज (दि. १३) डिसेंबर रोजी त्या ठिकाणी अखेर एक बिबट्या जेरबंद झाला आहे. एक विशेष बाब म्हणजे, मळे परिसरातील एक वृद्ध महिला बिबट्या जेर बंद झाला त्या परिसरात बेलाच्या झाडाची पूजा नित्यनेमाने करीत असतात. आज देखील सकाळी पहाटे त्या ठिकाणी पूजा करून परतत असताना हा बिबट्या तिथे होता. परंतु सुदैवाने महिलेवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही व बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. निलेश भंदुरे यांनी वनविभागाचे आभार मानत अजून याठिकाणी असलेल्या बिबट्यांसंदर्भात जलद गतीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच आज सातपूर मळे परिसरासह गंगापूर रोड वरील उच्चभ्रू वसाहती मधील रामेश्वर नगर, सिरीन मिडोज, केशर बंगल्या जवळ देखील एक बिबट्या दिसून आला आहे.  त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button