खुसखुशीत चकली ‘या’ राज्यातून झाली आपली; जाणून घ्या खमंग इतिहास | पुढारी

खुसखुशीत चकली 'या' राज्यातून झाली आपली; जाणून घ्या खमंग इतिहास

History of Chakli : मूळ दाक्षिणात्य पदार्थ भारतभर कसा पोहोचला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीतील फराळातील सर्वाधिक आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे चकली. खमंग, तिखट चवीची चकली कितीही खाल्ली तरी समाधान होत नाही. हीच चकली चहाची चवही वाढवते.

चकली, लाडू, चिवडा, करंजी असे किती तरी पदार्थ फराळाचे ताट सजवतात. या प्रत्येक पदार्थाचा स्वतःचा एक वेगळा इतिहास आहे. या पदार्थांची चव, त्यांचा रंग, आकार यातील वेगळेपण एक प्रकारे आपली सांस्कृतिक विविधता दर्शवते. फराळाच्या पदार्थांचा उगम हा भारतातील वेगवेगळ्या भागांत झालेला आहे, तर काही पदार्थांचे मूळ भारताबाहेरही दिसते.

Kai Murrukuतर सर्वांना प्रिय असणारी चकली हा मुळात दाक्षिणात्य पदार्थ आहे. तामिळनाडूमधील प्रसिद्ध स्नॅक असलेले मुरुक्कू म्हणजे चकलीचे आद्यरूप होय. मुरुक्कू याचा तामिळ अर्थ ‘पीळ’ असा आहे. हा पदार्थ तांदळाचे पीठ आणि उदडाचे पीठ यापासून बनवतात. आता मुरुक्कू विविध आकारांत उपलब्ध आहे. मुरुक्कू तामिळनाडूत दिवाळीतील खास पदार्थ आहे.

तामिळनाडूतून हा पदार्थ भारताच्या विविध भागांत पोहोचला. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरात आणि महाराष्ट्रात हा पदार्थ पोहोचला आहे. केरळमध्ये गुलाबाच्या आकाराचा गोड पदार्थ बनवला जातो, याला अचू मुरुक्कू असे नाव आहे, तर मनाप्पाराई मुरुक्कू हा खमंग पदार्थ आहे. तर काई मुरुक्कू या पदार्थाला हाताने आकार दिला जातो.

मुरुक्कूचा कर्नाटकातील भाऊ म्हणजे बेन्ने मुरुक्कू. तर याचा महाराष्ट्रीय अवतार म्हणजे चकली. चकलीमध्ये उदडाच्या पिठाची जागा, डाळीच्या पिठाने घेतली आहे.

हेही वाचा

Back to top button