Navratri Fasting : कच्च्या केळींपासून बनवा चकली, उपवासासाठी नक्की ट्राय करा | पुढारी

Navratri Fasting : कच्च्या केळींपासून बनवा चकली, उपवासासाठी नक्की ट्राय करा

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपवासाला कच्च्या केळ्यांपासून बनलेली चकली खा. यामध्ये साबुदाण्याचा वापर केला जातो. कच्च्या केळ्यांपासून बनवलेली चकली खूप टेस्टी असते. शिवाय भूक शमणारी आणि हेल्दीही आहे. या चकलीची रेसिपी अगदी हटके आहे (Navratri Fasting) आणि बनवायलादेखील सोपी आहे. तर आज आम्ही तुम्हा कच्च्या केळांपासून उपवासाची चकली कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत. (Navratri Fasting)

साहित्य –

३-४ कच्ची केळी

एक वाटी भिजलेला शाबूदाणा

२-३ हिरव्या मिरच्या

एक लहान चमचा जिरे

चवीपुरते मीठ

तळणीसाठी थोडं तेल

कृती –

गॅसवर पाणी ठेवून त्यात ३-४ कच्ची केळी पाच मिनिटांपर्यत शिजवून घ्यावीत.

थंड झाल्यानंतर केळ्याच्या साली काढून ती मिक्सरमध्ये किंवा घरातील किसणीने बारीक करावीत.

यात एक वाटी रात्री भिजत ठेवलेला शाबूदाणा घालावा.

या मिश्रणात एक चमचा जिरे, बारीक चिरलेली मिरची, चवीपुरते मीठ घालावे.

हे सर्व मिश्रण एकत्रित करून गोळा तयार करावा.

यानंतर एका वाळवण वाळवण्याच्या कागद घेवून त्यावर चकल्या करण्यासाठीच्या साचाने गोल चकल्या पाडाव्यात.

हे वाळवण दोन ते तीन दिवस कडक उन्हात चांगले वाळवावे.

यानंतर मंद आचेवरील गॅसवर तेल गरम करून त्यात या चकल्या सोडाव्यात.

केसरी रंग येईपर्यंत चकल्या चांगल्या तळून घ्याव्यात.

यानंतर उपवासाच्या दिवशी अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यत खंमग चकल्या सेव्ह करा.

टिप- या चकल्या गोल आल्या नाहीत, तरी एका रेषेत घातल्या तरी चालतात. या चकल्या उन्हात वाळवण्याने फार काळ टिकतात आणि आपल्याला पाहिजे तेव्हा वापरता येतात.

Back to top button