Hingoli News : मराठा आरक्षणप्रश्नी औंढा नागनाथ बसस्थानकासमोर रास्ता रोको | पुढारी

Hingoli News : मराठा आरक्षणप्रश्नी औंढा नागनाथ बसस्थानकासमोर रास्ता रोको

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी औंढा नागनाथ येथील बसस्थानकासमोर औंढा हिंगोली राज्य रस्त्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनास औंढा शहरासह परिसरातील मराठा बांधव सहभागी झाले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औंढा नागनाथ शहरात आज (दि.२) बसस्थानकसमोर औंढा हिंगोली मुख्य मार्गावर सकाळी रास्तारोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली. आंदोलनात औंढा शहरासह परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान रास्ता रोकोची दखल घेत औंढा पोलीस प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरापासून एक ते तीन किलोमीटरच्या अंतरावर पिंपळदरी फाटा व जिंतूर फाटा येथे वाहने थांबविण्यात आल्याने औंढा वसमत -परभणी, औंढा जिंतूर व औंढा हिंगोली रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्तारोको दरम्यान अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी एक मराठा लाख मराठाची प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी २ वाजता रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले व वाहतुकीस मार्ग मोकळा करण्यात आला.

हेही वाचा 

Back to top button