ब्रेकिंग! अजित पवार यांना डेंग्यूची लागण | पुढारी

ब्रेकिंग! अजित पवार यांना डेंग्यूची लागण

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शनिवारी त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले, पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे, असे ट्विट राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.

अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याचे प्रसारमाध्यमांकडून सांगितलं जात आहे. पण काल त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की, पुन्हा त्यांचे कर्तव्ये पार पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने परततील, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button