मुंबईत एपीएमसीत कांद्याच्या दरात ५ रूपयांची वाढ; येत्‍या आठवड्यात १५ टक्‍के वाढीची शक्‍यता | पुढारी

मुंबईत एपीएमसीत कांद्याच्या दरात ५ रूपयांची वाढ; येत्‍या आठवड्यात १५ टक्‍के वाढीची शक्‍यता

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा राज्यात कांदा उत्पादक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याला तेजी आल्यानंतर आज (शनिवार) पुन्हा एकदा मुंबई एपीएमसीत कांद्याला किलोमागे पाच रूपयांची दरवाढ झाल्याचे दिसून आले.

मुंबई घाऊक बाजारात गेल्या तीन दिवसांपूर्वी कांदा 45 ते 50 रूपये किलो होता. आज (शनिवार) 50 ते 55 रूपये किलोपर्यंत कांद्याने मजल मारली. तर किरकोळ बाजारात कांदा 60 रूपये किलो वरून 65 रूपये किलो झाला. नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यातील सर्वच बाजारात कांद्यांने 4800 ते 5200 तर सोलापूर 2500 ते 6500 रूपये क्विंटल दर आहे. विशेष म्हणजे शेतक-यांना संभ्रमात टाकण्याचे काम सध्या केंद्र सरकारने सुरू केले आहे. अनेक शेतक-यांना बफर स्टाक म्हणजे काय हेच माहीत नसल्याने सरकार कांद्याचे भाव पाडणार या भितीने शेतकरी चांगलाच बितरला आहे.

एनसीसीसी आणि नाफेडकडे किती कांदा शिल्लक आहे. हा संशोधनाचा विषय असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. निर्यातीच्या शुल्कात दरवाढ करत शेतक-यांचे केंद्राने आधी कंबरडे मोडले. आता जेमतेम दरवाढ झाली. त्यात आता बफर स्‍टॉक बाहेरून काढून कांदा 25 रूपये किलो विक्री करण्याचे षडयंत्र आखले. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामुळे दररोज बाजारात बदल होऊ लागले आहेत. ऐन दिवाळीच्या सणासुदीला शेतक-यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकवण्याचा प्रकार सरकारकडून सुरू केला जात आहे. अनेक बाजार समितीत बफर स्टॉकच्या चर्चाने कांद्याचे बाजार भाव काही प्रमाणात कोसळण्यास सुरूवात झाली आहे. मात्र याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असे ही दिघोळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button