Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार १०, २०२३ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार १०, २०२३

चिराग दारूवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

राशिभविष्य

मेष : आजच्‍या दिवसाची सुरुवात समाधानकारक कामांनी होईल. मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत फोनवर महत्त्वाचे संभाषण फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमची कामे आत्मविश्वासाने आणि पूर्ण उर्जेने करू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. दिवसाच्या उत्तरार्धात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्यासमोर अचानक एखादी समस्या उद्भवू शकते, चुकीच्या कामातही वेळ बिघडू शकते. कधी कधी तुमचा अतिआत्मविश्वास कामात व्यत्यय आणू शकतो, याची जाणीव ठेवा. कामाच्या ठिकाणी कामाच्या दडपणामुळे थोडा ताण येऊ शकतो. वैवाहिक जीवनातील गैरसमजांमुळे काही वाद होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.

 

वृषभ

वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज दिवसाच्‍या सुरुवातीला काही अडचणी येण्‍याची शक्‍यता आहे. तुमचा आत्मविश्वास आणि दृढनिश्चय याद्वारे तुम्ही त्यावर सहज उपाय शोधू शकता. धार्मिक कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळू शकते. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करेल. अचानक खर्चाची परिस्थिती उद्भवू शकते. तुमचे बजेट लक्षात ठेवा. सदस्याच्या तब्येतीचीही चिंता असेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ग्लॅमर, कला, सौंदर्य इत्यादींशी संबंधित व्यवसायात मनाप्रमाणे यश मिळू शकते. पती-पत्नीमधील भावनिक नातं अधिक मजबूत होतील. ॲसिडिटी आणि छातीत जळजळीची समस्या उद्‍भवू शकते.

 

राशिभविष्य

मिथुन : आज ग्रहाची उत्कृष्ट साथ लाभेल. यामुळे तुमच्या आत्मविश्वास आणि कार्यक्षमतेला अधिक बळ मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. आज मौल्यवान वस्तूच्‍या खरेदीचा योग आहे. एखाद्या सामाजिक उत्सवात सन्मानाची संधी मिळू शकते. तुमच्या व्यवहारात लवचिकता ठेवा. जवळच्या मित्र किंवा भावासोबत कमी बोलणे ही मोठी समस्या ठरु शकते. आयात-निर्यातीच्या व्यापारात नुकसान होण्‍याची शक्‍यता. पती-पत्नीचे नाते उत्तम राहील. अॅसिडिटी, बद्धकोष्ठता अशा तक्रारी जाणवू शकतात.

 

कर्क

कर्क : श्रीगणेश म्‍हणतात, आज तुमच्‍या दिवसाची सुरुवात चांगली होईल. तुमच्यासाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छाही पूर्ण होऊ शकते. तुमच्या कामातील उत्साह तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो. घाईत चुकीचा निर्णय घेतल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे शांत राहणे महत्त्वाचे आहे. तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात. लहानसहान गैरसमजांमुळे वैवाहिक नात्यात तणाव निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. काही कारणास्‍तव मानसिक ताण वाढू शकतो.

 

सिंह

सिंह : आजची ग्रहस्थिती तुम्‍हाला अनुकूल आहे. तुम्ही तुमची कामे व्यवस्थित सुरू करू शकाल. जवळच्या व्यक्तीसोबत भेट होईल आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होईल, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक संस्थेतील सेवेशी संबंधित कामातही योग्य वेळ जाईल. निष्काळजीपणामुळे कोणतेही सरकारी काम अपूर्ण ठेवू नका, त्‍यामुळे दंड होऊ शकतो. वारसाहक्काच्या बाबतीत गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. लोकांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका. व्यवसायात तुम्ही केलेले प्रयोग फायदेशीर ठरू शकतात. जोडीदाराचे सहकार्य तुम्हाला दिलासा देईल. आरोग्य उत्तम राहील.

 

कन्या

कन्या : आजच्‍या दिवशी भाग्य आणि परिस्थिती तुमच्यासाठी चांगली वेळ निर्माण करत आहे, असे श्रीगणेश म्‍हणतात. सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही दृष्ट्या तुमचे वर्चस्व कायम राहील. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकाल. मालमत्तेशी संबंधित खरेदी-विक्रीची कामे अत्यंत काळजीपूर्वक करा. सध्या या कामांसाठी परिस्थिती अनुकूल नाही. अनावश्यक खर्चही होऊ शकतो. परदेशात एखादी योजना चालू असेल तर ती सध्या टाळावी. आयात-निर्यातीच्या व्यापारात कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. आरोग्य उत्तम राहील

 

तुळ

तूळ : आजचा दिवस थोडा संमिश्र परिणाम घेऊन येत असल्याचे श्रीगणेश सांगतात. एखाद्या संपर्काद्वारे महत्त्वाची माहिती मिळू शकते. ही माहिती तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. दुपारच्या वातावरणामुळे थोडे प्रतिकूल वातावरण निर्माण होत आहे. तुमच्यासमोर अचानक एखादी समस्या उभी राहील आणि कामाच्या दबावामुळे तणाव निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या लोकांशी लाभदायक भेटी होतील. कुटुंबासाठी तुम्‍ही वेळ न दिल्याने जोडीदाराला नैराश्य जाणवले.

राशिभविष्य

 

वृश्चिक : आज तुम्‍हाला अचानक कोणीतरी महत्त्‍वाची व्‍यक्‍ती भेटेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक प्रश्न सुटतील, असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजक आणि ज्ञानवर्धक साहित्य वाचण्यात वेळ जाईल. जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत भेटणे आनंददायक ठरेल. जवळच्या नातेवाईकाच्या तब्येतीच्‍या तक्रारीमुळे मन निराश होईल. आज कर्ज व्‍यवहार टाळा. मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. म्हणूनच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. करिअरशी संबंधित समस्या बऱ्याच अंशी सुटू शकतात. घसा खवखवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

राशिभविष्य

 

धनु : आज समाजात तुमची छाप चांगली राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अधिक जागरूक राहणे हे आज आकर्षणाचे कारण असेल, असे श्रीगणेश सांगतात. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवेल. आर्थिक व्‍यवहार करताना सावधगिरी बाळगा. तुम्ही आर्थिक संकटातही सापडू शकता. व्यवसायात, तुमच्या कामाचा दर्जा उत्तम ठेवण्यावर भर द्या. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ कुटुंबासाठी काढा. आरोग्य उत्तम राहिल.

 

राशिभविष्य

मकर : आज परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. कोणतीही योजना करण्यापूर्वी त्यावर योग्य चर्चा करा. तसेच कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. आर्थिक
व्‍यवहारात दुसर्‍यवर विसंबून राहून नका सर्व कामे स्वतः करा. व्यावसायिक परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. जोडीदारासोबत योग्य समन्वय राखला जाईल. खोकला, ताप यासारख्या समस्या जाणवण्‍याची शक्‍यता.

 

कुंभ

कुंभ : आज घराच्या नूतनीकरण किंवा देखभालीबाबत चर्चा कराल. कोणत्याही सामाजिक कार्यात तुमचे योगदान महत्त्वपूर्ण राहिल, असे श्रीगणेश म्‍हणतात. तुम्ही घर किंवा वाहन खरेदीचे नियोजन करत असाल तर त्यासाठी वेळ योग्य आहे. कधी कधी अंधश्रद्धा आणि तुमच्या विचारांमधील संकुचितता या नकारात्मक गोष्टींमुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो. तुमचे वर्तन आणि विचार बदलण्यासाठी थोडे आत्मपरीक्षण करा. आज कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. ॲलर्जी आणि खोकल्‍यचा त्रास होण्‍याची शक्‍यता

 

मीन

मीन : श्रीगणेश सांगतात, आज एखाद्या महत्त्वाच्या कौटुंबिक विषयावर चर्चा होऊ शकते. तुम्ही जमिनीशी संबंधित कामांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याची त्वरित अंमलबजावणी करा. तुमचा स्वभाव आणि विचार सकारात्मक ठेवा. काहीवेळा तुमचा संशयी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो. तरुणांनी निष्क्रिय कामांत वेळ न घालवता करिअरच्या योजनांवर लक्ष केंद्रित करावे पती-पत्नी व्यस्ततेमुळे घरी वेळ देऊ शकणार नाहीत. जास्त कामामुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो.

हेही वाचा

Back to top button