Ayodhya : अयोध्या होणार जगातील सर्वात मोठे धार्मिक केंद्र | पुढारी

Ayodhya : अयोध्या होणार जगातील सर्वात मोठे धार्मिक केंद्र

अयोध्या ः वृत्तसंस्था, Ayodhya : रामनगरी अयोध्येला आता जगातील सर्वात मोठे धार्मिक केंद्र बनविण्यासाठी सरकारने कंबर कसली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या प्रकल्पांवर लक्ष ठेवून आहेत. तब्बल 32 हजार कोटींचे प्रकल्प या ठिकाणी सुरू आहेत. विशेष म्हणजे रामलल्ला मंदिराचा खर्च वेगळा आहे. दरवर्षी येथे बारा कोटी भाविक भेट देतील, असा अंदाज आहे.पंतप्रधानांनी अयोध्येच्या विकासाबाबत दिल्लीत नुकतीच बैठक घेतली. बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अयोध्येचे आयुक्त व अन्य अधिकारीही उपस्थित होते.

Ayodhya : भव्य बसस्थानक

अयोध्या धाम बस स्थानकाची भव्य तयारी करण्यात येत आहे. 219 कोटी रुपये खर्चून 9 एकरांवर ते बांधले जात आहे. जे लोक आपल्या खासगी वाहनाने अयोध्येत येतील, ते जन्मभूमीच्या एक ते दीड किमी आधी वाहनतळात पार्क करतील. यानंतर ई-रिक्षाने मंदिरात जाता येईल.

Ayodhya : अयोध्या जंक्शन

अयोध्या जंक्शनसाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली होती. आता ही रक्कम 230 कोटी करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हे स्थानक उभारण्यात येत आहे. सुमारे 10 हजार चौरस मीटरमध्ये नवीन इमारत बांधण्यात येत आहे. यामध्ये 125 खोल्या, वसतिगृह, एस्केलेटर, फूड प्लाझा आणि 24 डब्यांच्या 3 प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसोबतच ही नवीन इमारत सुरू करण्याची सरकारची योजना आहे.

सरकार 320 कोटी खर्चून अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन टप्प्यात बांधत आहे. धावपट्टीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. टर्मिनलच्या इमारतीचे कामही 80 टक्के पूर्ण झाले आहे. पर्यटन विभागाच्या म्हणण्यानुसार, रामललाच्या अभिषेकपूर्वी विमानतळ सुरू होईल. विमानतळावरून 15 मिनिटांत राम मंदिरापर्यंत पोहोचता येते.

हे ही वाचा :

Back to top button