Pakistan Train Accident: पाकिस्तानात मोठी दुर्घटना, रेल्वे अपघातात ३३ ठार; ८० जखमी | पुढारी

Pakistan Train Accident: पाकिस्तानात मोठी दुर्घटना, रेल्वे अपघातात ३३ ठार; ८० जखमी

पुढारी ऑनलाईन: पाकिस्तानात नवाबशाह येथे आज (दि.६ ऑगस्ट) दुपारी मोठी रेल्‍वे दुर्घटना घडली आहे. हजारा रेल्वे एक्सप्रेसच्या ५ बोगी रुळावरून घसरल्या. शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान असलेल्या सहारा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.  यामध्ये ३३ प्रवाशी ठार झाले तर, ८० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचाआकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाकिस्‍तानमधील जिओ न्यूजने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

हजारा एक्स्प्रेस कराचीहून रावळपिंडीकडे निघाली होती. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु असून घसरलेल्या डब्यांमधून लोकांना बाहेर काढले जात आहे. अपघात कशामुळे झाला? याचा शोध सुरु असल्याचे पाकिस्तान रेल्वेचे उप अधीक्षक महमूद रहमान म्हणाले आहेत. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री ख्वाजा साद रफिक यांनी सांगितले की, “यांत्रिक बिघाड किंवा तोडफोड” यामुळे हा अपघात झाला असावा. अपघातानंतर जवळच्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आला आहे

 

रेल्वे दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून, ही एक्सप्रेस कराचीहून रावळपिंडीकडे जात होती. घटनास्थळी बचाव पथके आणि पोलीस अधिकारी रवाना झाले असून बचाव कार्य सुरू आहे. ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असल्याने यामधील ४० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती देखील स्थानिक माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे. टीव्हीवर प्रसारित झालेल्या फुटेजमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी रुळावरून घसरलेल्या बोगींजवळ जमलेले दिसत होते, त्यापैकी काही त्यांच्या बाजूला पडल्याचेही दिसत असल्याची माहिती येथील माध्यमांनी दिली आहे.

केंद्रीय रेल्वे आणि विमान वाहतूक मंत्री ख्वाजा साद रफीक यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना या घटनेबाबत सतर्क करण्यात आले असून, घटनास्थळी रेल्वे सचिव नवाबशाह उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button