ISIS कडून म्होरक्या अबु हुसैनच्या मृत्यूची पुष्टी; हा असेल नवीन ‘चिफ’ | पुढारी

ISIS कडून म्होरक्या अबु हुसैनच्या मृत्यूची पुष्टी; हा असेल नवीन 'चिफ'

पुढारी ऑनलाइन डेस्क : इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने अखेर आपला म्होरक्या अबु हुसैन अल हुसेनी अल कुरैशी याच्या मृत्यू झाल्याच्या माहितीची पुष्टी केली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या टेलिग्राम चॅनेलने प्रकाशित केलेल्या एका अप्रसिद्ध रेकॉर्डिंगमध्ये त्याच्या प्रवक्त्याने नवीन प्रमुखाचे नाव जाहीर केले. यामध्ये अबू हाफस अल हाशिमी अल कुरैशी हा आता इस्लामिक स्टेटचा नवीन प्रमुख असेल, अशी घोषणा करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याचे वृत्त दिले आहे.

ISIS : तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी अबु हुसैनच्या मृत्यूचा केला होता दावा

दहशतवादी संघटना ISIS चा (Islamic State of Iraq and Syria) प्रमुख अबू हुसैन अल कुरैशी हा मारला गेला आहे, असा मोठा दावा तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी केला होता. त्यांच्या दाव्यानुसार सीरियात 29 एप्रिल 2023 मध्ये राबवलेल्या एका ऑपरेशनमध्ये तुर्कीच्या सेनेने सीरियात घुसून ISIS च्या म्होरक्याला ढेर केले. अबू हुसैन अल कुरेशी याचा खात्मा केला आहे, असा दावा एर्दोगन यांनी टीव्हीवर केला होता.

त्याच्या काही महिन्यांपूर्वीच इसिस ने सांगितले होते की त्यांचा प्रमुख अबू हसन अल हाशिमी अल कुरेशी हा मारला गेला आहे. त्याच्या मृत्यूनंतर अबू हुसैन अल कुरैशी याने त्याची जागा घेतली होती. त्यानंतर तुर्कीचे राष्ट्रपती एर्देगन यांच्या दाव्यानुसार अबु हुसैन अल कुरेशी हा देखील मारला गेला आहे.

एर्दोगन ने म्हटले होते की, त्यांची संघटना दाएश/ISIS च्या संदिग्ध लीडरला मोठ्या काळापासून फॉलो करत होते. त्याचा कोड नेम अबू हुसैन अल कुरैशी आहे. ते म्हटले की तुर्की नेहमीच आतंकवादी संघटनांशी लढत आला आहे आणि पुढेही लढत राहणार आहे. तुर्कीने 2013 मध्ये दाएश ISIS या संघटनेला आतंकवादी संघटना घोषित केले होते.

इसिसने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती

एर्दोगन यांनी मे महिन्यात अबु अल हुसैन अल कुरैशीला मारल्याचा दावा केल्यानंतर इसिसने मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. इसिसकडून त्याच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली नव्हती.

त्यानंतर आता जवळपास तीन महिन्यानंतर अबू हाफस अल हाशिमी अल कुरैशी याची नेता म्हणून घोषणा केल्याचा संदेश इसिसच्या टेलिग्राम चैनलवरून आला आहे. त्यामुळे इसिसकडून अबु हुसैनच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा :

ISIS terrorists : इसिस दहशतवाद्यांचे निपाणी कनेक्शन; आंबोलीच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी

ISIS चा म्होरक्या ‘अबू हुसैन अल कुरैशी’चा खात्मा; तुर्कीचा दावा, सीरियात घुसून केले ‘काम तमाम’

US Drone Strike: अमेरिकी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात ISIS चा म्होरक्या ठार

Back to top button