US Drone Strike: अमेरिकी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात ISIS चा म्होरक्या ठार | पुढारी

US Drone Strike: अमेरिकी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात ISIS चा म्होरक्या ठार

पुढारी ऑनलाईन: पूर्व सीरियामध्ये अमेरिकेच्या लष्करी ड्रोन हल्ल्यात इसिसचा एक दहशतवादी ठार झाला आहे. या ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव मुहाजिर असे असून, तो इसिस या दशतवादी संघटनेचा (ISIS) मुख्य म्होरक्या होता, अशी माहिती अमेरिकन लष्कराने (US Drone Strike) दिली आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याविषयी सांगितले की, अमेरिकेने पूर्व सीरियातील दहशतवादी तळावर शुक्रवारी (७ जुलै) अमेरिकेकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एमक्यू-9 ड्रोन वापरून केलेल्या हल्ल्यात इसिसचा प्रमुख म्होरक्या ओसामा अल-मुहाजिर मारला गेला आहे, असे अमेरिकन लष्कराने निवेदनात म्हटले आहे. याच दिवशी रशियन विमानांनी देखील या दहशतवादी ड्रोनचा पाठलाग केला होता. अमेरिकेच्या लष्करी ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला व्यक्ती अल-मुहाजिरच आहे, अशी पुष्टी अमेरिकन सैन्याने अद्याप केलेली नाही. तसेच इतर कोणीही यासंदर्भात अजून माहिती (US Drone Strike) दिलेली नाही.

गेल्या वर्षभरात वॉशिंग्टनने सीरियातील संशयित ISIS अतिरेक्यांच्या विरोधात छापे टाकून कारवाई वाढवली आहे, 2019 मध्ये या दहशतवादाच्या गटाने सीरियातील प्रदेश सोडल्यानंतर त्यांच्या अनेक नेत्यांना काही तुर्की-समर्थित बंडखोरांच्या ताब्यातील भागात ठेवले तर काहींना अटक (US Drone Strike)  केली होती.

हेही वाचा:

Back to top button