ISIS चा म्होरक्या ‘अबू हुसैन अल कुरैशी’चा खात्मा; तुर्कीचा दावा, सीरियात घुसून केले ‘काम तमाम’ | पुढारी

ISIS चा म्होरक्या 'अबू हुसैन अल कुरैशी'चा खात्मा; तुर्कीचा दावा, सीरियात घुसून केले 'काम तमाम'

पुढारी ऑनलाइन डेस्क : दहशतवादी संघटना ISIS चा (Islamic State of Iraq and Syria) प्रमुख अबू हुसैन अल कुरेैशी हा मारला गेला आहे, असा मोठा दावा तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार सीरियात राबवलेल्या एका ऑपरेशनमध्ये तुर्कीच्या सेनेने सीरियात घुसून ISIS च्या म्होरक्याला ढेर केले आहे. अबू हुसैन अल कुरेशी याचा खात्मा केला आहे, असा दावा एर्दोगन यांनी टीव्हीवर केला आहे.

काही महिन्यांपूर्वीच ISIS ने सांगितले होते की त्यांचा प्रमुख अबू हसन अल हाशिमी अल कुरेशी हा मारला गेला आहे. त्याच्या मृत्यूनंतर अबू हुसैन अल कुरेैशी याने त्याची जागा घेतली आहे. आता तुर्कीचे राष्ट्रपती एर्देगन यांच्या दाव्यानुसार अबु हुसैन अल कुरेशी हा देखील मारला गेला आहे.

एर्दोगन ने म्हटले आहे की, त्यांची संघटना दाएश/ISIS च्या संदिग्ध लीडरला मोठ्या काळापासून फॉलो करत आहेत. त्याचा कोड नेम अबू हुसैन अल कुरैशी आहे. ते म्हटले की तुर्की नेहमीच आतंकवादी संघटनांशी लढत आला आहे आणि पुढेही लढत राहणार आहे. तुर्कीने 2013 मध्ये दाएश ISIS या संघटनेला आतंकवादी संघटना घोषित केले होते.

ISIS चे तुर्कीवर आत्मघाती हल्ले

ISIS ने तुर्कीवर अनेक वेळा हल्ले केले आहेत. यामध्ये 10 आत्मघाती हल्ल्यात 300 हून अधिक लोक मारले गेले. तर शेकडो लोक जखमी झाले होते. त्यानंतर तुर्कीने ISIS ला आतंकवादी संघटना घोषित करून त्याविरुद्ध अभियान सुरू केले होते. तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी म्हटले होते इस्लामिक कट्टरता पश्चिमी देशांमध्ये कँसरप्रमाणे पसरत आहे. मात्र, पश्चिमी राष्ट्र अद्याप आतंकवादाच्या आव्हानाशी समर्थपणे लढण्याचे प्रयत्न करताना दिसत नाही.

एर्दोगन यांनी दावा केला की अनेक देशांमध्ये मशीदी आणि मुसलमानांना निशाणा बनवले जात आहे. आणि ते आतंकवादी संघटनांचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक प्रकारे प्रयत्न करतील.

हे ही वाचा :

ISIS Attack : बारा सैनिकांसह ३२ जणांची ‘इसिस’ दहशतवाद्यांकडून हत्या

US banking crisis | अमेरिकेतील बँकिंग संकट गडद! आणखी एका बँकेची विक्री, जाणून घ्या त्याविषयी

राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी ‘Aapla Dawakhana’ योजना सुरू : मुख्यमंत्री

Back to top button