पुणे: माळशेज घाटात १४४ कलम लागू | पुढारी

पुणे: माळशेज घाटात १४४ कलम लागू

ओतूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाट हा पावसाळ्यात पर्यटनासाठी राज्यभर प्रसिध्द आहे. गत काळात घाटात अनेकदा अप्रिय घटना घडून जीवितहानी झाल्याने व येथील शांतता, कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून ३० ऑगस्टपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती टोकावडे पोलिसांनी दिली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात घाटातील धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद व निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठविण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे माळशेज घाटात येत असतात. त्यामुळे कलम १४४ लागू करण्यात आले असून, माळशेज घाटात टोकावडेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक भदे, पोलिस जवान संदीप औटी, पोलिस हवालदार कडव यांच्यासह सुमारे २० पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

हेही वाचा:

भाव वाढीमुळे 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खरेदी करणे केले बंद, तर 46 टक्के लोकांनी एक किलोसाठी मोजले 150 रुपये, सर्वेक्षणातून माहिती समोर

पुण्यात खड्डे आणि पावसाळी कामांसाठी विशेष पथके नेमा’: ‘राष्ट्रवादी (अजित पवार गट); निवेदनद्वारे महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे: मांगूरची वाहतूक करणारा टेम्पो पकडला, १ हजार ८०० किलो मासे केले नष्ट

 

Back to top button