Heavy rainfall alert: पुढचे चार दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा: IMD ची माहिती | पुढारी

Heavy rainfall alert: पुढचे चार दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा: IMD ची माहिती

पुढारी ऑनलाईन: पुढचे पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये कोकणासह, महराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा (Heavy rainfall alert) देण्यात आला आहे, अशी माहिती आयएमडी पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

डॉ. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे. आज (दि.०५) सिंदुधुर्ग तर उद्या (दि.०६) रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट (Heavy rainfall alert) देण्यात आला आहे. दरम्यान कोकण किनारपट्टी, मराठवाडा, विदर्भ या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button