पावसाळ्यात 22 दिवस मोठे उधाण; साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार | पुढारी

पावसाळ्यात 22 दिवस मोठे उधाण; साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत अरबी समुद्राला तब्बल 22 दिवस मोठे उधाण आहे. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस पडला तर, शहर व उपनगरांत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत नुकतीच पावसाळ्यात समुद्राला येणार्‍या भरतीची माहिती जाहीर केली आहे.

या यादीनुसार यंदाच्या पावसाळ्यात 22 दिवस अरबी समुद्रात मोठे उधाण राहणार आहे. यापैकी 7 दिवस हे जून महिन्यातील असून 4 दिवस जुलै, 5 दिवस ऑगस्ट महिन्यातील तर सप्टेंबर महिन्यातील 6 दिवस आहेत. यापैकी सर्वाधिक 4.84 मीटर उंच लाटा या 20 सप्टेंबरला मध्यरात्री 1 वाजून 3 मिनिटांनी उसळणार आहेत. समुद्राला मोठी भरती असताना शहरात मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पावसाळ्यातील 25 दिवस पालिकेसाठी मोठी परीक्षा आहे.

जून

या 22 दिवशी मोठी भरती
बुधवार 5 जून सकाळी 11.17 वा. 4.61 मीटर
गुरुवार 6 जून दुपारी 12.05 वा. 4.69 मीटर
शुक्रवार 7 जून दुपारी 12.50 वा. 4.67 मीटर
शनिवार 8 जून दुपारी 1.34 वा. 4.58 मीटर
रविवार 23 जूनदुपारी 1.09 वा. 4.51 मीटर
सोमवार 24 जून दुपारी 1.53 वा. 4.54 मीटर
मंगळवार 25 जून दुपारी 2.36 वा. 4.53 मीटर

जुलै

सोमवार 22 जुलै दुपारी 12.50 वा. 4.59 मीटर
मंगळवार 23 जुलै दुपारी 01.29 वा. 4.69 मीटर
बुधवार 24 जुलै दुपारी 2.11 वा. 4.72 मीटर
गुरुवार 25 जुलै दुपारी 2.51 वा. 4.64 मीटर

ऑगस्ट

सोमवार 19 ऑगस्ट सकाळी 11.45 वा. 4.51 मीटर
मंगळवार 20 ऑगस्ट दुपारी 12.22 वा. 4.70 मीटर
बुधवार 21 ऑगस्ट दुपारी 12.57 वा. 4.81 मीटर
गुरुवार 22 ऑगस्ट दुपारी 1.35 वा. 4.80 मीटर
शुक्रवार 23 ऑगस्ट दुपारी 2.15 वा. 4.65 मीटर

सप्टेंबर

मंगळवार 17 सप्टेंबर सकाळी 11.14 वा. 4.54 मीटर
बुधवार 18 सप्टेंबर सकाळी 11.50 वा. 4.72 मीटर
गुरुवार 19 सप्टेंबर मध्यरात्री 00.19 वा. 4.69 मीटर
दुपारी 12.24 वा. 4.78 मीटर
शुक्रवार 20 सप्टेंबर मध्यरात्री 01.03 वा. 4.84 मीटर
दुपारी 01.02 वा. 4.70 मीटर
शनिवार 21 सप्टेंबर मध्यरात्री 01.47 वा. 4.82 मीटर
दुपारी 01.42 वा. 4.50 मीटर
रविवार 22 सप्टेंबर मध्यरात्री 02.33 वा. 4.64 मीटर

Back to top button