Sanjay Leela Bhansali Heeramandi : ‘हिरामंडी’विषयी मोठा खुलासा, १४ भाषांमध्ये संजय लीला भन्साळींची सीरीज ओटीटीवर पाहता येणार | पुढारी

Sanjay Leela Bhansali Heeramandi : 'हिरामंडी'विषयी मोठा खुलासा, १४ भाषांमध्ये संजय लीला भन्साळींची सीरीज ओटीटीवर पाहता येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक संजय लीला भन्साळींची पहिली सीरीज ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग झाला आहे. भव्य सेट, जाडजूड दागिने, आणि तगडी स्टारकास्ट यामुळे हिरामंडीची चर्चा होत आहे. (Sanjay Leela Bhansali Heeramandi) मीडिया रिपोर्ट्सनुसार भन्साळींची सीरीज ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ आज नेटफ्लिक्सवर दिड वाजता रिलीज झाला आहे. हा भन्साळींचा डिजिटल डेब्यू सीरीज आहे. रिलीजच्या आधी ‘हिरामंडी’ खूप चर्चेत होती. आता या सीरीजशी संबंधित एक नवी माहिती समोर आलीय. (Sanjay Leela Bhansali Heeramandi)

ही सीरीज आता एकूण १४ भाषांमध्ये ओटीटीवर दिसणार आहे. ही सीरीज हिंदी, तमिल, तेलुगु, मल्याळम, कन्नडसह अन्य भाषांमध्ये रिलीज होईल.

सीरीजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा आणि ऋचा चड्ढा शिवाय संजीदा शेख, अदिती राव हैदरी आणि शरमिन सहगल आहे. तर शेखर सुमन, अध्ययन सुमन देखील मुख्य भूमिकेत आहे.

Back to top button