नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड | पुढारी

नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धा उत्तर प्रदेश येथे दि. 27 ते 31 मे दरम्यान होत असून या स्पर्धेसाठी हिरे महाविद्यालयाच्या रोइंग व अ‍ॅथलेटिक्समधील खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे.

खेलो इंडिया आंतरविद्यापीठ रोइंग स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या अनिकेत तांबे, गणेश माळी, ओमकार राऊत (एमए) व रोशन तांबे (एसवायबीकॉम) यांची, तर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी हर्षल ढाकणे (एमए) या विद्यार्थ्यांची निवड पुणे विद्यापीठ संघात झाली आहे. या सर्व खेळाडूंनी या अगोदर झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्येही कांस्यपदक पटकावले होते. महात्मा गांधी विद्या मंदिरचे जनरल सेक्रेटरी व समाजश्री डॉ. प्रशांत हिरे, विश्वस्त डॉ.स्मिता हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे, डॉ. अद्वय हिरे, महाविद्यालय विकास समितीच्या उपाध्यक्षा डॉ. योगिता हिरे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके, प्राचार्य तथा विश्वस्त डॉ. बी. एस. जगदाळे, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, आदिवासी सेवा समितीचे सहसचिव राजेश शिंदे, उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थी यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा:

Back to top button