नाशिक : नाट्य परिषद कार्यकारिणीची आज होणार निवडणूक | पुढारी

नाशिक : नाट्य परिषद कार्यकारिणीची आज होणार निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर आता नियामक मंडळातून निवड होणार्‍या कार्यकारिणीची निवडणूक मंगळवारी (दि.16) मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात पार पडणार आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले व नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी अध्यक्षपदासाठी दावेदार आहेत. या निवडणुकीत नाशिक शाखेचे सुनील ढगे सहकार्यवाह पदासाठी निवडणूक लढवणार आहेत. या पदाच्या 3 जागा असून, 6 उमेदवार रिंगणात आहेत. नाट्य परिषदेचा अध्यक्ष 1, उपाध्यक्ष (प्रशासन) 1, कोषाध्यक्ष 1, प्रमुख कार्यवाह 1, सहकार्यवाह 3, कार्यकारिणी समिती सदस्य 11 अशा एकूण 18 जागांसाठी मतदान होणार आहे.
अध्यक्ष : प्रशांत दामले, नवनाथ कांबळी, उपाध्यक्ष : नरेश गाडेकर, अविनाश नारकर, कोषाध्यक्ष : सतीश लोटके, वीणा लोकूर, प्रमुख कार्यवाह : जगन्नाथ चितळे, अजित भुरे, सहकार्यवाह : सुनील ढगे, समीर इंदुलकर, सुकन्या मोने, दिलीप कोरके, अजय दासरी, ऐश्वर्या नारकर तसेच कार्यकारिणी समिती सदस्य पदाचे 13 उमेदवार असणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button