पारनेर बाजार समितीच्या सभापतिपदी तरटे | पुढारी

पारनेर बाजार समितीच्या सभापतिपदी तरटे

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांचीस तर उपसभापतिपदी भाऊसाहेब उर्फ बापूसाहेब शिर्के यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक मंडळाच्या बैठकी तसभापतिपदासाठी बाबासाहेब तरटे उपसभापतिपदासाठी बापूसाहेब शिर्के यांचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आले होता. त्यामुळे निवडणूक अधिकारी सहायक निबंधक गणेश औटी यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.

समितीत राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गट महाविकास आघाडीची आमदार नीलेश लंके, माजी आमदार विजय औटी, माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता आली.बैठकीस संचालक प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, आबासाहेब खोडदे बाबासाहेब तरटे, संदीप सालके, रामदास भोसले, किसन सुपेकर, पद्मजा श्रीकांत पठारे, मेघा श्रीरंग रोकडे, गंगाराम बेलकर, बाबासाहेब नर्‍हे, विजय पवार, किसनराव रासकर, भाऊसाहेब शिर्के, शंकर नगरे, अशोकलाल कटारिया, चंदन बळगट, तुकाराम चव्हाण यांच्यासह माजी सभापती सुदाम पवार, दीपक पवार, कारभारी पोटघन, संदीप चौधरी, माजी सरपंच राहुल झावरे, सरपंच प्रकाश गाजरे, बाळासाहेब खिलारी, अरुण पवार, पोपटराव गुंड, भाऊ चौरे आदी उपस्थित होते.

बाजार समितीचा लौकीक वाढवू

नवनिर्वाचित सभापती तरटे म्हणाले, आमदार नीलेश लंके यांनी मला संधी देऊन जो न्याय दिला आहे ते कधीच विसरणार नाही. कांदा विक्रीसाठी राज्यात पारनेर बाजार समितीचा नावलौकिक आहे. तो पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे. संचालकांना बरोबर घेऊन बाजार समितीचा विकास करण्यात येईल.

शिवसैनिकांची नाराजी

राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली गेली. त्यामुळे सेना ठाकरे गटाकडे उपसभापती पद येईल, अशी शक्यता शिवसैनिकांसह सर्वांनी वर्तवली होती. मात्र, दोन्ही जागेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागल्याने शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा होती.

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ

उपसभापती शिर्के यांनी संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत बाजार समितीतील व्यापारी हमाल मापाडी शेतकरी वर्गाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Back to top button