Weather Aleart : महाराष्ट्राला पुढील 4-5 दिवस ‘यलो’ अलर्ट; विदर्भात गारपीटीची शक्यता | पुढारी

Weather Aleart : महाराष्ट्राला पुढील 4-5 दिवस 'यलो' अलर्ट; विदर्भात गारपीटीची शक्यता

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांना पुढचे चार ते पाच दिवस यलो अलर्ट (Weather Aleart) देण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अलर्ट देण्यात आला आहे. २४ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत या भागांत विजांच्या गडगडाटांसह, वादळी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, येत्या २ ते ३ दिवसांत विदर्भात मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाट, जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर उद्या सोमवारी (दि.२४) विदर्भात काही ठिकाणी गारपीटीची (Weather Aleart) शक्यता असल्याचे देखील IMD पुणे, चे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

उत्तर पाकिस्तान आणि पंजाबच्या जवळील मध्य भागांवर वेस्टर्न डिस्टर्बन्स (Weather Aleart) निर्माण झाले आहे. यामुळे चक्रीय वादळ आणि वारे मध्यप्रदेश पासून चेन्नईपर्यंत खालच्या स्तरावर वाहत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे देखील IMD पुणे यांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button