Sharad Pawar’s visit to Nagpur : शरद पवार रविवारी पुन्हा विदर्भात, नव्या समिकरणाची नांदी! | पुढारी

Sharad Pawar's visit to Nagpur : शरद पवार रविवारी पुन्हा विदर्भात, नव्या समिकरणाची नांदी!

नागपूर; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी पुन्हा एकदा विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. नागपूर व अमरावती दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मध्यंतरी ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या जागेच्या पाहणी संदर्भात आले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे भेट घेतली. त्यांच्याकडे त्यांनी केलेले स्नेहभोजन देखील राजकीय दृष्ट्या चर्चेत आले. त्यानंतर अदानी पवार यांच्या संबंधाची चर्चा जोरात सुरू झाली. भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जवळीक आणि अजित दादा पवार मुख्यमंत्री होणार इथपर्यंतच्या अनेक गोष्टींची चर्चा सातत्याने सुरू आहे. (Sharad Pawar’s visit to Nagpur)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे रविवारी सकाळी 10:30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते कारने अमरावतीला रवाना होतील. रहाटगाव येथे हॉटेलमध्ये भेटीगाठीनंतर दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी कृषी पदवीधर यांच्या बैठकीला ते उपस्थित राहतील. सायंकाळी सहा वाजता अमरावतीवरून नागपूरसाठी निघतील व रात्री साडेआठ वाजता नागपूर विमानतळावरून मुंबईसाठी रवाना होतील असा त्यांचा दौरा आहे. (Sharad Pawar’s visit to Nagpur)

माजी मंत्री अनिल देशमुख सोबत असतील. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे रात्री नागपुरात आगमन होत आहे. दक्षिण नागपुरात ओबीसी सेलच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते नियोजित कार्यक्रमानुसार भंडारा,गोंदियाकडे रवाना होणार आहेत. (Sharad Pawar’s visit to Nagpur)

वज्रमुठ सभेनंतर रंगली मविआत फुटीची चर्चा (Sharad Pawar’s visit to Nagpur)

नागपुरात महाविकास आघाडी आघाडीची वज्रमुठ सभा गेल्या रविवारी पार पडली. या सभेनंतर महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप जवळीक होणार का? अशाही चर्चा खूप रंगल्या. स्वतः विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मी शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असा निर्धार जाहीर केला आहे. मात्र, एका मुलाखतीत त्यांनी आपली मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

महाविकास आघाडीमधूनही या वक्तव्यावर उलट -सुलट वक्तव्य येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री होणार अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उद्योजक गौतम अदानी- पवार भेट, जेपीसीच्या मुद्द्यावर अदानी यांची केलेली पाठराखण, भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची शरद पवार यांनी घेतलेली भेट, हा सर्व घटनाक्रम पाहता आगामी काही दिवस महाराष्ट्रात नव्या राजकीय घडामोडी पहायला मिळतील याचे संकेत देणारे म्हणता येतील. किंबहुना आगामी निवडणुकांपूर्वी नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे. सर्वच राजकीय पक्ष विदर्भावर तूर्त लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button