KL Rahul IPL 2023 : विजयानंतर केएल राहुल म्हणाला, ‘कर्णधार म्हणून माझ्याकडून चूक झाली’ | पुढारी

KL Rahul IPL 2023 : विजयानंतर केएल राहुल म्हणाला, 'कर्णधार म्हणून माझ्याकडून चूक झाली'

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलामीवीर काइल मायर्सच्या अर्धशतकानंतर, गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे लखनौ सुपरजायंट्सने बुधवारी राजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव केला. विजयानंतर लखनौचा कर्णधार केएल राहुलने एक प्रसंग सांगत कर्णधार म्हणून आपली चूक झाली असल्याचे सांगितले.

लखनौ सुपर जायंट्सच्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांच्यात ८७ धावांची भागीदारी केली. रॉयल्सला अथक प्रयत्नानंतरही २० षटकांत ६ बाद १४४ धावांवर समाधान मानावे लागले. सामन्यानंतर लखनौचा कर्णधार केएल राहुलने समन्या दरम्यान घडलेल्या एका घटनेबद्दल सांगत कर्णधार म्हणून आपली चूकही मान्य केली. सामन्यादरम्यान राहुलला त्याच्या सहकाऱ्याने थ्रो मारला होता. हा प्रसंग सांगताना राहुल म्हणाला की, ‘मला माझ्या सहकाऱ्याचा थ्रो जाणवला, त्यावेळी मला समजले की मी कर्णधार म्हणून काहीतरी चुकीचे करत आहे. आम्ही १६० धावांच्या लक्ष्याचा विचार करत होतो, पण ते होऊ शकले नाही.

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही १० धावा कमी केल्या पण गोलंदाजांनी ती उणीव भरून काढली. इथे दव नव्हते, त्यामुळे दोन्ही संघांसाठी समान संधी होती. सामना खेळताना १८० धावांचा टप्पा पार करता येतो हे समजले. जर आम्ही थोडे चांगले खेळलो असतो तर आम्हाला किमान १७० धावा तरी मिळाल्या असत्या. आम्हाला माहित आहे की, राजस्थानची ताकद हे त्यांचे अव्वल चार फलंदाज आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना बाद करण्यासाठी योजना आखण्याची गरज होती, असेही केएल राहुल याने सांगितले.

 

Back to top button