मोठी बातमी : ‘सततचा पाऊस’ आता नैसर्गिक आपत्ती : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय | पुढारी

मोठी बातमी : 'सततचा पाऊस' आता नैसर्गिक आपत्ती : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन : अवकाळीचा फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता राज्य मंत्रीमंडळाने आज ( दि. ५ ) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘सततचा पाऊस’ नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात आल्याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळ बैठकीत (State cabinate metting) घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  या वेळी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला असताना, राज्य शासनाने शेतकऱ्याला दिलासा देणारा हा निर्णय (State cabinate metting) घेतला आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत इतरही काही महत्त्वाचे निर्णय  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले आहेत.

State cabinate metting: राज्य मंत्रिमंडळातील बैठकीतील निर्णय

  • सुधारित रेती धोरणास मान्यता.  ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. रेती लिलाव बंद.
  • नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता. ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारणार.
  • देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल.
  • सेलर इन्स्टिट्यूट ‘सागर’ भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण.
  • महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.
  • अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता.
  • नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्या ‘परिस स्पर्श’ योजना.

हेही वाचा:

Back to top button