नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णांना आठ महिन्यात बारा लाख रुपयांची मदत | पुढारी

नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णांना आठ महिन्यात बारा लाख रुपयांची मदत

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दि. १ जुलै २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या आठ महिन्याच्या कालावधीत नांदगाव तालुक्यातील जवळपास १६ रुग्णांना १२ लाख रुपयांपेक्षा अधिक निधीची मदत आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत दि. १ जुलै २०२२ ते १ मार्च २०२३ या आठ महिन्यात नांदगाव विधानसभा मतदार संघातील गरजू रुग्णांना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या शिफारशीने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून हे अर्थसहाय्य करण्यात आले. मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्य व शासकीय सुविधा संबंधी मोफत सेवा आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून घरपोच दिल्या जात आहेत. सोबतच विशेष शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शिफारस करून रुग्णांना मदत केली जाते. मागील ८ महिन्यात आता पर्यंत १२ लाख एक हजार रुपयांचा निधी विविध रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहिती पत्राद्वारे आमदार सुहास कांदे यांना दिली.

हेही वाचा:

Back to top button