जालना शहरात शिवजागर; राज्‍यपालांना पदमुक्‍त करण्याची मागणी | पुढारी

जालना शहरात शिवजागर; राज्‍यपालांना पदमुक्‍त करण्याची मागणी

जालना; पुढारी वृत्‍तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदमुक्त करावे, या मागणीसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) किल्‍ले रायगडावर शिव सन्मान जागर केला. या शिव सन्मान जागराच्या समर्थनार्थ जालना शहरात मराठा क्रांती मोर्चा व समविचारी पक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवजागर केला.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरूषांविषयी अवमान होईल, असे वक्‍तव्य केले होते. यामुळे राज्‍यभरातून विरोध, प्रदर्शने होत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त करावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा कृती समितीच्यावतीने दिनांक 7 डिसेंबर रोजी जालना बंदची हाक देण्यात आली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त करावे, या मागणीसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) किल्‍ले रायगडावर शिव सन्मान जागर केला. या शिव सन्मान जागरच्या समर्थनार्थ जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवजागर करण्यास सुरूवात झाली आहे.

यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील, शिवसेनाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार शिवाजीराव चोथे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष रवींद्र राऊत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जगन्नाथ काकडे, जयभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे, सकल ओबीसी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र राख, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी व मराठा क्रांती मोर्चा कृती समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

हेही वाचा : 

Back to top button