Shradha Murder Case : महरौलीच्या जंगलात पोलिसांना मिळालेले शरीराचे दोन तुकडे कोणाचे? | पुढारी

Shradha Murder Case : महरौलीच्या जंगलात पोलिसांना मिळालेले शरीराचे दोन तुकडे कोणाचे?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shradha Murder Case : दिल्लीतील महरौलीच्या जंगलात पोलिसांना शरीराचे दोन तुकडे सापडले आहेत. ते श्रद्धा वालकरच्याच शरीराचे आहेत का? हे तपासण्यासाठी पोलिसांनी ते लॅबमध्ये पाठवले आहेत. सध्या दिल्ली पोलीस श्रद्धा वालकर खून प्रकरणातील पुरावे शोधण्याच्या कार्य करत आहेत. या खून प्रकरणात दररोज नवनवीन माहिती उजेडात येत आहे.

Shradha Murder Case : श्रद्धा खून प्रकरण हे पोलिसांसमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. कारण या निर्घृण खून प्रकरणात आरोपीने मयताच्या शरीराचे 35 तुकडे करून दिल्लीतील वेगवेगळ्या भागात फेकून दिले आहे. त्यामुळे श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधणे आणि ते श्रद्धाचेच आहे हे सिद्ध करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असेल. अनेक कायदेतज्ज्ञांच्या मते पुराव्या अभावी आरोपी आफताब सुटू शकतो.

शुक्रवारी या प्रकणात साकेत कोर्टाने आरोपी आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्यास परवानगी दिली. त्याचवेळी त्यावर थर्ड डिग्री टॉर्चर वापरू नये, असेही आदेश दिले आहे. तसेच आरोपी आफताब याने देखिल नार्को टेस्ट करण्याचे मान्य केले आहे.

Shradha Murder Case : याशिवाय शनिवारी आरोपी आफताबचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्याला सकाळी-सकाळी बॅग घेऊन आपल्या घराजवळ फिरताना पाहण्यात आले आहे. 18 ऑक्टोबरला रेकॉर्ड झालेल्या सीसीटीव्ही फुटेजने याचा खुलासा झाला आहे. या व्हिडिओतून असा संशय आहे की तो श्रद्धाच्या शरीराचे तुकडे बाहेर घेऊन जात होता. या फुटेजची पुष्टी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. हा या हत्याकांडातील समोर आलेला पहिला सीसीटीव्ही फुटेज आहे.

Shradha Murder Case : दरम्यान, श्रद्धाच्या ऑफिसमधील तिचा जुना मित्रा आणि एक्स मॅनेजर यांच्यातील चॅटचे स्क्रीनशॉट देखिल समोर आले आहे. तर एका मित्राने आपल्या जबाबत म्हटले आहे की तसे तर श्रद्धा खूप खूश आणि मनमिळावू स्वभावाची होती. मात्र, आफताबसोबत भांडण झाल्यानंतर ती स्वतःला इतरांपासून वेगळे दूर करून घ्यायची. जेणेकरून तिला कोणाशीही खोटे बोलण्याची गरज पडू नये.

हे ही वाचा :

IndvsNZ T20 : भारत-न्यूझीलंडच्या T20 सामन्यात पडणार रेकॉर्ड्सचा पाऊस!

गोव्यात आजपासून इफ्फी; रंगारंग कलाविष्कार

Back to top button