IndvsNZ T20 : भारत-न्यूझीलंडच्या T20 सामन्यात पडणार रेकॉर्ड्सचा पाऊस! | पुढारी

IndvsNZ T20 : भारत-न्यूझीलंडच्या T20 सामन्यात पडणार रेकॉर्ड्सचा पाऊस!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IndvsNZ T20 New Zealand Vs India 2nd T20I : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना पावसाने वाहून गेल्यानंतर, भारतीय संघ रविवारी येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यासाठी हवामानाचा अंदाज फारसा चांगला नाही. त्यामुळे या सामन्यावरही पावसाचे संकट दाटले आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत, अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्या भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करत आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत उपकर्णधार आहे. रोहितशिवाय या दौऱ्यासाठी अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि सलामीवीर लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत शुभमन गिल, उमरान मलिक, इशान किशन आणि संजू सॅमसन यांना संघात संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, आजच्या दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान काही रेकॉर्ड्सची देखील नोंद केली जाऊ शकते, जे जागतिक क्रिकेटला नक्कीच आश्चर्यचकित करतील. विशेषत: सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार यांना मोठा विक्रम करण्याची संधी असेल. (IndvsNZ T20 New Zealand Vs India 2nd T20I)

भुवनेश्वर कुमार इतिहास रचू शकतो

आजच्या सामन्यात, जर भुवी (Bhuvneshwar Kumar record) त्याच्या गोलंदाजीदरम्यान 4 विकेट घेण्यात यशस्वी झाला तर तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल. सध्या हा विश्वविक्रम आयर्लंडच्या जोशुआ लिटलच्या नावावर आहे, ज्याने एका कॅलेंडर वर्षात 26 सामन्यांत एकूण 39 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत 30 सामन्यांत 36 विकेट घेतल्या आहेत. (IndvsNZ T20 New Zealand Vs India 2nd T20I)

सूर्यकुमार यादव युवराज सिंगला मागे टाकण्याची संधी

आजच्या सामन्यात भारताचा एक्स फॅक्टर फलंदाज सूर्यकुमार यादव 3 षटकार मारण्यात यशस्वी ठरला तर तो या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल. त्याच्याआधी माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंगने आपल्या टी 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 74 षटकार ठोकले आहेत. तर सूर्यकुमार यादवला आतापर्यंत 72 षटकार मारण्यात यश मिळाले आहे.

ऋषभ पंतलाही संधी

भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतलाही आजच्या सामन्यात विशेष कामगिरी करण्याची संधी आहे. जर ऋषभ दुसऱ्या टी 20 सामन्यात 30 धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो त्याच्या ती 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 1000 धावा पूर्ण करेल. असा पराक्रम करणारा तो भारताचा 11वा फलंदाज ठरू शकतो.

Back to top button