जालना अपघात : भरधाव कारने २ ऊस गाड्यांना उडवले; २ ऊसतोड कामगारांसह ३ बैल जखमी | पुढारी

जालना अपघात : भरधाव कारने २ ऊस गाड्यांना उडवले; २ ऊसतोड कामगारांसह ३ बैल जखमी

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दोन ऊस टायर गाड्यांना मागून धडक दिली. या अपघातात दोन ऊसतोड कामगारांसह तीन बैल जखमी झाले. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान वडीगोद्री -जालना मार्गावरील धाकलगावाजवळ घडली.

कारखान्यात ऊस घातल्‍यावर टायर गाड्या पुन्हा शहापूरकडे ऊस तोडणीसाठी जात होत्‍या. यावेळी दोन ऊस टायर गाड्यांना मागून येणाऱ्या कार क्रमांक एम. एच. 21 सी 3385 ने मागून दोन टायर गाड्यांना धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, एक टायर गाडी रोडच्या खाली जावून पलटी झाली, तर दुसऱ्या टायर गाडीचे चाख तुटून टायर निघाले.

या धडकेत तीन बैल जखमी झाले असून, ऊसतोड कामगार ज्ञानेश्वर धोंडिबा शिंदे (वय 40) रा.शहापूर ता. अंबड, रामेश्वर कल्याण कापसे (वय. 42) रा. दाढेगाव ता. अंबड हे दोघे जखमी झाले. कारने दोन ऊस गाड्यांना धडक दिल्‍यानंतर कार पलटी झाली, मात्र कारमधील कुणाचीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे काहीकाळ महामार्गावर गर्दी झाली होती. या अपघातामुळे ऊस तोड कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा :  

Back to top button