गवती चहा प्या, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या अधिक

गवती चहा प्या, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या अधिक
Published on
Updated on

सर्दीने हैराण झाल्यावर कितीतरी औषधांचा भडिमार केला तरी ती हळूहळूच कमी होते. एकदम कमी होत नाही. पण अँटीबायोटिकबरोबर काही आयुर्वेदिक औषधांचा त्यामानाने चांगला इफेक्ट होतो. यामध्ये गवती चहा हा महत्त्वाचा ठरतो.

गवती चहाचे उपयोग खालीलप्रमाणे…

सर्दी, पडसे आणि अंग मोडून ताप आला की, आपल्या परसदारी असलेला गवती चहा स्वयंपाकघरात येतो. गवती चहा घालून बनवलेला चहा आरोग्याच्या तक्रारी कमी करतो. गवती चहा एक प्रकारचे गवतच आहे. याची बेटे दंभीच्या बेटासारखी वाढतात. याला पातीचा चहा म्हणतात. गवती चहापासून काढलेल्या तेलाला ट्री ऑईल म्हणतात.

ताप आला असताना घाम येणे हे ताप उतरण्याच्या द़ृष्टीने आवश्यक असते. गवती चहाची भरपूर पाने घालून बनवलेला चहा ताप आलेल्या व्यक्तीस दिल्याने, खूप घाम येऊन ताप उतरतो. अजीर्णामुळे पोट दुखत असेल तर गवती चहाच्या तेलाचे दोन थेंब बत्ताशावर टाकून खायला द्यावे. उलट्या, जुलाब होत असतील तर गवती चहामुळे थांबतात.

सांधे दुखी, सांध्यातून कट कट आवाज होणे, सांधे सुजणे या तक्रारींवर गवती चहाचे तेल चमचाभर घेऊन दोन चमचे खोबरेल तेलात मिसळून गरम करावे. त्यात एक कापराची वडी टाकून त्या तेलाने दुखरे सांधे मालीश करावे आणि शेकावे. गवती चहाच्या वाफेने दररोज शेक घेतल्याने भरपूर घाम जाऊन चरबी जळते आणि वजन कमी होण्यास मदत होते. गवती चहा, पुदिना, दालचिनी, आलं सम प्रमाणात घेऊन त्यात पाणी आणि गूळ मिसळून काढा करावा. हा काढा अर्धा कप प्रमाणात रोज रात्री प्यावा आणि उबदार कपडे, पांघरुण घेऊन झोपावे. यामुळे जुनाट सर्दी पडसे कमी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news